सोनुर्ली (वन) येथे शिवजयंती थाटात साजरी
सूर्यतेज शिव मंडळ यांच्यातर्फे आयोजन
दिपक खेकारे
गडचांदूर - " शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात" या संकल्पना देशातील प्रत्येक नागरिकांना राबवावी या संकल्पनेतून सोनुर्ली (वन) येथील सूर्यतेज शिव मंडळ यांच्यातर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी आठ वाजता गावात रॅली काढून सामाजिक संदेश देणारे संदेश प्रदर्शित करण्यात आले गावातील लोकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन शिवघोषना दिल्या . गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, रॅलीचे प्रमुख आकर्षण बाळ शिवाजी महाराज , जिजामाता, डॉ बाबासाहेब आबेडकर ,आणि मावळे यांची वेशभूषा परिधान करून असलेल्या बाल वर्ग यांनी शोभा वाढवली ढोल आणि लेजिम च्या माध्यमातून व विविध सामजिक संदेशांच्या पोस्टर मधून गावकऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी चौकातील ध्वजाचे वंदन करून रॅली समाप्त करण्यात आली
सायंकाळी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रबोधनकार मा. चीडे गुरुजी यांचे प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले....

0 Comments